Excitement over the discovery of unidentified bodies under the Raita river bridge sj

  • पुण्यात अशाच एका कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी कोथरूड येथील परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली.

पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. काही लोकं घरातूनच कामं करत आहे. तर काही लोकांच्या हाताला कामचं नाहीये. तसेच काही कुटुंबात वादग्रस्त परिस्थिती निर्माण होत आहे. पुण्यात अशाच एका कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवारी कोथरूड येथील परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव भाग्यश्री पाटील असे आहे. तसेच वयवर्ष ३० आहे. लॉकडाऊन झाल्यापासून भाग्यश्री आणि तिचे पती अमेय हे दोघेही वर्क फ्रॉम होम करायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे या वादाला कंटाळून महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.   

दरम्यान, महिलेने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर तिचा पती अमेयने तिला लगेचच रूग्णालयात दाखल केले. परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांने सांगितले. येथील पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आहे. तसेच या मागील नेमकं कारण काय आहे. या सर्व गोष्टींची तपासणी पोलीस करत आहेत.