मंचर पाेलीस ठाण्यात परवानगीशिवाय चित्रीकरण ; युवकावर गुन्हा दाखल

मंचर : मोबाईल गहाळ झाल्याबाबतचा दाखला घेण्यासासाठी मंचर पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तीने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय चित्रीकरण केल्याप्रकरणी सचिन लक्ष्मण रोकडे (वय ३४, रा. देवगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लक्ष्मण रोकडे मंचर पोलीस ठाणे येथे मोबाईल गहाळ झाल्याबाबतचा दाखला नेण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने यापूर्वी लेखी तक्रार अर्ज दिला असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिसांनी लेखी अर्ज चौकशी अंमलदार सागर गायकवाड यांना भेटायला सांगितले. त्यानंतर सचिन राेकडे पोलीस ठाण्यात असलेल्यां कर्मचाऱ्यांचे संभाषण चित्रीकरण करत असल्याचे पोलिस जवान राजेंद्र हिले यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याचा मोबाईल घेतला. मोबाईल पाहिला असता त्यामध्ये पोलीस ठाणे अंमलदार कक्षामध्ये चाललेले काम व वार्तालापाचे व्हिडिओ चित्रीकरण केलेले दिसले. चित्रीकरणाचा गैरफायदा होऊ शकतो. पोलिस ठाण्यातील कामे शासकीय स्तरावर असून असे चित्रीकरण करुन शासकीय गोपनीयता भंग केल्याप्रकरणी सचिन रोकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलिस वैशाली कोणकेरी यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस जवान राजेंद्र हिले करत आहेत.