दुकानाला आग : एका कामगारांचा जागीच मृत्यू ; निगडीतील यमुनानगर येथील घटना

पिंपरी : कॉम्प्युटर दुरुस्तीच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकानात काम करणाऱ्या नेपाळ येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवारी) यमुनानगर येथे एलआयसी बिल्डिंग जवळ सकाळी उघडकीस आली. अंकित अगरवाल (वय २७, रा. यमुनानगर, निगडी. मूळ रा. नेपाळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अग्निशमन दलाकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथे एलआयसी बिल्डिंग जवळ असलेल्या व्हिजन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क या दुकानाला आग लागली. याची माहिती सकाळी साडेसात वाजता पिंपरी चिंचवड अग्निशमन केंद्राला मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र आणि प्राधिकरण उपविभाग यांचा प्रत्येकी एक बंब घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे.

या आगीच्या घटनेमध्ये एका कामगार तरुणाचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण देखील अद्याप समजू शकलेले नाही. मयत तरुण त्याच दुकानात काम करत होता आणि दुकानातच राहत होता. दुकानाच्या पोटमाळ्यावर ही आग लागली असून त्यात त्या कामगाराचा मृत्यू झाला आहे.

रविवारी रात्री झोपताना त्याने आतून लॉक लावून घेतले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत जाण्यास अडचण आली. काही वेळेनेनंतर जवानांनी शटर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी अंकित मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्याचा मृत्यू नेमका आगीत होरपळून झाला की गुदमरून झाला याची माहिती शवविच्छेदनानंतर मिळणार आहे.