भोरमध्ये दुकाने,भाजीमंडई बंद

भोर :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरूवारपासून येत्या ३ मे पर्यंत शहरातील सर्व दुकाने,भाजीमंडई बंद ठेवण्याचा निर्णय महसूल व नगरपालीका प्रशासनाने घेतला आहे.

 भोर :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरूवारपासून येत्या ३ मे पर्यंत शहरातील सर्व दुकाने,भाजीमंडई बंद ठेवण्याचा निर्णय महसूल व नगरपालीका प्रशासनाने घेतला आहे. या काळांत नागरिकांना लागणारा किराणा, धान्य,भाजीपाला दुकानांतून स्वयंसेवक, ग्रामदूत, नगरसेवकां मार्फत पुरवण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी नगरपरिषदेमध्ये उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव,तहसिलदार अजित पाटील, मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार थोरात, नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपाध्यक्ष गणेश पवार,गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागा मध्ये तीन ते चार स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांनी नागरिकांकडून लागणाऱ्या वस्तू, भाजीची यादी घ्यायची. त्यानुसार दररोज सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत किराणा, भाजी तर रात्री आठ पर्यंत औषधे संबधितांना पोहोच करावीत असे नियोजन केले आहे. तशा सूचना दुकानदारांना दिलेल्या आहेत.शहराला लागून असलेले सर्व प्रवेश मार्ग येत्या ३ मे पर्यंत बंद केल्याचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी सांगीतले.