पुण्यात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने खुली राहणार – महापौर मुरलीधर मोहळ

या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील नव्या निर्बंधांबाबतची माहिती दिली आहे. या नव्या निर्बंधांनुसार पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

    पुणे: राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला आहे. मात्र संसर्गाचा धोका लक्षात घेत राज्यातील लोकडाऊन १५ जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. सध्यस्थितीला पुण्यातील बाधित रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यापासून घटली या असली तरी मृत्यूचे प्रमाण अद्याप कमी झालेले नाही. पंरतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णसंख्या कमी झालेल्या शहरात नियमांमध्ये थोडी शिथिलता करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
    या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील नव्या निर्बंधांबाबतची माहिती दिली आहे. या नव्या निर्बंधांनुसार पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

    पुण्यात उद्यापासून काय सुरु राहणार?
    – सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार आहेत.
    –  शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.
    –  रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक १४ एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.
    – पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहणार आहेत.
    –  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील.
    – कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.
    – ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.

    पुण्यात काय बंद असणार?
    – पुण्यातील उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार आहे.
    – शनिवार आणि रविवार सकाळी ७ ते २ यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.
    – दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

    महापौरांचे  आवाहन
    दरम्यान, शहरातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.