शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन’; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना चॅलेंज

चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो. ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

    पुणे : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

    राऊत नेमकं काय म्हणाले?

    चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केलंय. मी तर नेहमी आव्हान देतो शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा. मी राजकारण सोडतो. ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. ते शिरुर-हवेली येथे बोलत होते. चंद्रकांतदादांना महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आलेलं सहन होत नाही. जेवढे तुम्ही तडफडत राहणार. तेवढी तुमची शक्ती क्षीण होईल. आघाडीच्या नेत्यांनाही सांगणं आहे की, तुम्ही विरोधकासारखे वागू नका. मी आज वरिष्ठांशी बोलेन. ऐकलं तर बघू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत सांगू, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, शिवसेना हा लाव्हा आहे. शिवसेना मागे हटणार नाही. आमचं बळ हे आमच्या मनात आणि मनगटात आहे. आज आमदार आहेत. उद्या असतील की नाही माहीत नाही. सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा, असा सल्ला राऊतांनी पदाधिकाऱ्यांना यावेळी बोलताना दिला आहे.