श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान महाशिवरात्र यात्रा रद्द ; तहसीलदार रुपाली सरनोबत यांची माहिती

ध्या असणाऱ्या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भुलेश्वर मंदिर येथील सुरक्षा व यात्रा नियोजन या विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या असणारी परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून (दि.८) मार्च रोजी श्री क्षेत्र भुलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्र यात्रा नियोजन बैठक पार पडली.

  माळशिरस : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील जागृत देवस्थान,पुणे जिल्ह्यामधील शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र भुलेश्वर या ठिकाणी महाशिवरात्र यात्रा दरवर्षी प्रमाणे या वर्षी गुरुवारी (दि. ११) मार्च रोजी भरणार होती. सध्या असणाऱ्या कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर भुलेश्वर मंदिर येथील सुरक्षा व यात्रा नियोजन या विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या असणारी परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून (दि.८) मार्च रोजी श्री क्षेत्र भुलेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्र यात्रा नियोजन बैठक पार पडली.

  -नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे
  यावेळी बोलताना पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार रुपाली सरनोबत म्हणाल्या, दरवर्षी प्रमाणे फक्त धार्मिक विधी होणार आहे. तर फक्त मदिरात पुजारी येऊन नित्य पूजा करतील तर या यात्रा काळात जर कोणी या ठिकाणी आले तर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल आहे. सध्या असणाऱ्या कोरोना या विषाणूजन्य आजार असल्याने प्रत्येकाने नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

  यावेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके, माजी उपसरपंच माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे, रूपाली गुरव, माजी तंटामुक्ती उपाध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड, नवनाथ यादव, उध्दव यादव, ग्रामसेविका सोनाली पवार, मंडल अधिकारी भारत भिसे, गाव कामगार तलाठी सतीश काशीद, पोलिस पाटील पुजा यादव, पुरातत्व विभागाचे साईनाथ जंगले व भुलेश्वर देवस्थानचे सर्व पुजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

  “मंदीर आणि मंदीर परिसरात महाशिवरात्रीच्या आधल्या दिवशी पासून पोलिस बंदोबस्त राहणार आहे.या काळात जर कोणी व्यक्ती नियमांचे उलंघण करताना आढळल्यास किंवा ट्रिपल सीट प्रवास किंवा पाच व्यक्ती पेक्षा जास्त समूहाने असल्यास कारवाई केली जाईल.

  -सुनील महाडीक, पोलिस निरीक्षक, जेजूरी पोलिस ठाणे