यावर्षी देखावे नाही, मंदीरात गणेशाेत्सव साजरा करा

पुणे पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

पुणे : काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन यंदा गणेशाेत्सवात गणेश मंडळांना देखावे सादर करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. गणेश मंदीरातच मुर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशाेत्सव साजरा करा, असे आवाहन पुणे पाेिलसांनी गणेश मंडळांना केले आहे.

गणेशाेत्सवाच्या संदर्भात महापािलकेत गुरुवारी  महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, तसेच शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

-गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करू

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, दरवर्षी आपण सर्व गणेशोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करतो. मात्र यंदा आपण काेराेनाच्या संकटाचा सामना करीत आहाेत. काेराेना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. हे लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करू या, गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढण्यात येणार नसून भाविकांना डिजिटलच्या माध्यमातुन दर्शनाची व्यवस्था करावी. त्याच बरोबर गणेश मूर्तीचे विसर्जन मंडळांच्या जवळ आणि घरगुती गणपती घरीच करावे.’’

यावर्षी गणेश मंडळांना देखावे सादर करण्यास परवानगी नसल्याचे सह अायुक्त िशसवे यांनी स्पष्ट केले.‘‘ राज्यात, पुण्यात काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ हाेत असताना, यंदाचा गणेशोत्सव आपण सर्वजण साध्या पद्धतीने साजरा करुयात. जेणे करून करोना विषाणूंचा प्रादुर्भाव आणखी होणार नाही. त्या पार्श्वभूमीवर मी सर्व मंडळांना साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की, आपण यंदाचा गणेशोत्सव मंदिरात साजरा करू ’’असे आवाहन सह आयुक्त शिसवे यांनी उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले.

 -गणेश मंडळांची आर्थिक मदतीची मागणी  

 काेराेनामुळे अर्थ कारण ठप्प झाले आहे. आमचे वर्गणीदार हे व्यापारी असल्याने त्यांच्याकडे देखील पैसे नाहीत. यामुळे सर्व मंडळे आर्थिक दृष्टया मोठ्या संकटात आहे. त्यामुळे महापालिकेने १० बाय १० फुट अाकाराच्या  मंडपाचा खर्च उचलावा. तसेच प्रत्येक मंडळांना महापालिकेने १ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीवेळी केली.