तापमानात लक्षणीय बदल; हैराण करणाऱ्या उकाड्यानंतर आज मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील चार दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार,  कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    पुणे :  राज्यात तापमानात वाढ झाल्यानंतर आता अचानक वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट झाली असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

    कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील चार दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार,  कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    9 एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.