धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

खडकवासला, पानशेत, वरसगांव धरण निम्मे भरले

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात पाच टिएमसी इतकी वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत अािण वरसगांव ही धरणे निम्मी भरली  आहेत. या धरणातील एकुण पाणीसाठी १५ टिएमसी इतका झाला आहे.

मंगळवारपासून शहर आणि धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहराचा पाणी पुरवठा आणि जिल्ह्यातील काही भागांतील शेतीला पाणी पुरवठा या धरणांतून केला जाताे. साेमवारपर्यंत या चारही धरणातील एकुण पाणी साठा १० टिएमसी इतकाच हाेता. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि  टेमघर या चारही धरणांच्या पाणलाेट क्षेत्रात मंगळवारपासून जाेरदार पाऊस पडत आहे. गुरुवारी पावसाचा जाेर थाेडा ओसरला असला तरी, पाणी साठ्यात गेल्या तीन दिवसांत पाच टिएमसीने वाढ झाली  आहे.. या चारही धरणांपैकी पानशेत आणि वरसगाव  या धरणांची पाणीसाठवण क्षमता जास्त अाहे. तुलनेत खडकवासला आणि टेमघर धरणांची साठवण क्षमता कमी आहे.

गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे गुरुवारी सांयकाळी पाच पर्यंत खडकवासला धरणात  १. ५३ टिएमसी पाणी जमा झाले आहे. त्याची टक्केवारी ७७.७३ इतकी आहे. तर पानशेत धरणांतील पाणीसाठा ६.१७ िटएमसीपर्यंत पाेचला असुन, त्याची टक्केवारी जवळजवळ ५८ टक्के इतकी आहे. वरसगांव धरणांत ६.१४ िटएमसी इतके पाणी असुन, त्याची टक्केवारी जवळ जवळ ५० टक्क्यापर्यंत पाेचली अाहे. टेमघर धरणात  १.१८ टिएमसी पाणीसाठा असुन, त्याची टक्केवारी ३२ टक्के इतकी झाली आहे. या चारही धरणांच्या पाणलाेट क्षेत्रात गुरुवारी सकाळी सहा ते संायकाळी पाचपर्यंत अनुक्रमे १२, ३१, ३७ आणि  ४५ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. पाणलाेट क्षेत्रातुन धरणातून वाहुन येणाऱ्या पाण्यामुळे पाणीसाठ्यात अाणखी वाढ हाेत राहील. पावसाचा जाेर कायम राहीला तर खडकवासला धरणातून नदीत पाण्याचा िवसर्ग सुरू करण्याची शक्यता आहे.