कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणसवाडीत शुकशुकाट

कवठे येमाई : पुणे- नगर महामार्गावरील सणसवाडी औद्योगीक विभागातील कंपन्या व बाजारपेठेतील सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवून कोरोनाला हटविण्यासाठी सर्वानी एकजुटीने लढा देण्याचा संकल्प केल्याने गाव परिसरात सर्व ठिकाणी सामसुम पसरली आहे.

 कवठे येमाई : पुणे- नगर महामार्गावरील सणसवाडी औद्योगीक विभागातील कंपन्या व बाजारपेठेतील सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवून कोरोनाला हटविण्यासाठी सर्वानी एकजुटीने लढा देण्याचा संकल्प केल्याने गाव परिसरात सर्व ठिकाणी सामसुम पसरली आहे. ग्रामपंचायत व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी नागरिकांनी काय दक्षता घ्यावयाच्या या बाबतच्या सुचना देवून नागरीकांना सतर्क करून या अदृश्य शत्रुचा शिरकाव होऊ नये म्हणुन शर्थीचे प्रयत्न केले आहेत. पोलीस प्रशासन व ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करत नागरिकांनी सहकार्य केले.

-परराज्यातील कंत्राटी कामगार हतबल झाले
परप्रांतीय कामगार व गोरगरीबासाठी सणसवाडी व शिक्रापुर येथील दान शुर भुजबळ परिवार, हरगुडे, दरेकर परिवारांतील अनेक सेवाभावी कार्यकर्त्यानी गरजूंना शिधा सामंग्री व भोजने देवून मदतीचा हात दिला आहे. तर अनेक घरमालकांनी कंपन्या बंद असल्याने त्यांच्याकडे वास्तव्यास असणाऱ्या कामगारांचे खोलीभाडे माफ केलेआहे. २० तारखेला कंपन्या चालू होतील या आशेवर थांबलेले परराज्यातील कंत्राटी कामगार हतबल झाले असून जर हाताला कामच नसेल तर थांबून काय करायचे व काय खायच म्हणून गावी जाण्याचे विचारात आहेत. असे असताना कोरोना महामारी सारख्या या भयंकर संकटाचा शेवट होण्यासाठी सहकार्य करुन येथे घरीच थांबू पण कोणत्याही शासकीय नियमांचे व सूचनांचे जिव गेला तरी उलूंघन करणार नाही असे ही ते बोलून दाखवत आहेत.