विविध मागण्यांसाठी नाभिक संघटनेतर्फे शिरूर तहसील कार्यालयासमोर मूक आंदोलन

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासुन हातावर पोट असलेल्या सलून व्यावसायिकांना अर्थिक अडचणीमुळे उपासमारीसह विविध अडचणींचा सामना करावा लागत

शिरूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासुन हातावर पोट असलेल्या सलून व्यावसायिकांना अर्थिक अडचणीमुळे उपासमारीसह विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत शासनास वेळोवेळी निवेदन देऊन सलून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी,अर्थिक पॅकेज जाहिर करावे यांसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरूर तालुका व शिरूर शहर नाभिक संघटनेच्यावतीने शिरूर तहसिल कार्यालयासमोर मूक आंदोलन करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिरूरच्या तहसिलदार लैला शेख यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

           यावेळी नाभिक संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष गणपत क्षिरसागर,शिरूर शहराध्यक्ष निलेश भोसले,तालुका सचिव दत्तात्रय शिंदे,माजी शहराध्यक्ष रणजीत गायकवाड,माजी उपाध्यक्ष गणेश शिंदे,तालुका उपाध्यक्ष हनुमंत पंडीत,शहर सचिव सनी थोरात,बाळासाहेब गायकवाड,सल्लागार गोरख गायकवाड यांसह नाभिक समाजातील नागरीक उपस्थित होते.

                  लाॅकडाऊन सुरू असल्याने गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासुन सलुन दुकान सुरू उघण्यास परवानगी नसल्याने अर्थिक अडचणींमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली असुन विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.याबाबत शासनास वेळोवेळी निवेदन देऊन सलुन दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा नाभिक समाजास अर्थिक पॅकेज देऊन मदत करावी यांसह विविध मागण्या करण्यात आलेल्या असुन त्याची दखल न घेतल्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले असुन त्यानुसार शिरूर तालुका व शहर नाभिक संघटनेच्यावतीने मंगळवार दि.९ रोजी हातात मागणीचे फलक घेऊन तसेच काळी फित बांधुन शिरूर तहसिल कार्यालयासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शांततेत मुक आंदोलन करून मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिरूरच्या तहसिलदार लैला शेख यांच्या मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.