‘या’ दिवसापासून पुणे- मुंबई दरम्यान सिंहगड एक्सप्रेस धावणार ; जाणून घ्या ‘वेळ’

गाडीला शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर व सीएसएमटी या स्थानकांवर थांबा देण्यात आला. प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

    पुणे: येत्या १८ ऑक्टोबरपासून पुणे- मुंबई दरम्यान सिंहगड एक्सप्रेस (sinhagad express) धावणार असल्याची दिलासादायक माहिती रेल्वे प्रशासन दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी आता पूर्ण होत आहे.
    पुणे स्थानकावरून ही गाडी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघेल. मुंबईला ९ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. मुंबई हुन संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल पुण्याला रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. गाडीला शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर व सीएसएमटी या स्थानकांवर थांबा देण्यात आला. प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रशासनाने देहूरोड व तळेगाव आदी स्थानकावर देखील गाडीला थांबा द्यावा हि मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.