भावजयीवर सुरीने वार करून दिराने केला खून

जेजुरी :  पोलीस स्टेशन हद्दीतील रिसे या गावी भावजयीने शरीरसुखास नकार दिल्याने दिराने सुरीने वार करून भावजयीचा खून केल्याची घटना घडली असल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली. मुबारक कादर सय्यद (रा.रिसे ता पुरंदर जि पुणे )असे आरोपीचे नाव असून खून केल्या नंतर हा आरोपी फरार झाला आहे .

याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुरंदर तालुक्यातील रिसे येथे सय्यद कुटुंबीय राहतात. गेली अनेक दिवसांपासून आरोपी मुबारक सययद हा आपली भावजय वय ४५ हिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत होता .तर भावजय नकार देत होती . सोमवार दि २१ रोजी रात्री जेवण झाल्यानंतर भावजय शाबीरा या खरकटी भांडी घासत असताना आरोपी मुबारक हा घरात गेला ,घराची कडी आतून लावून त्याने भावजय कडे शरीर सुखाची मागणी केली . यावेळी घरातील व्यक्तींनी हे तू काय करतोस,घराची कडी उघड असे ओरडून सांगितले .मात्र त्याने ऐकले नाही .भावजय शरीर सुखाला नकार देत आहे म्हणून चिडून जाऊन मुबारक याने भावजयच्या गळ्यावर, छातीवर,हातापायावर सुरीने वार करून तिचा खून करून तो फरार झाला आहे .