पुणे जिल्हा रिंग रोड प्रकल्पाला वरोधी करत पुणे विधान भवन येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

महाराष्ट्रमध्ये एका थोबाडीत शब्दाबद्दल किती घाणेरड्या प्रकारचं राजकारण चालू आहे. आणि इथे शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही सोडवायचे दुर्लक्ष करता. मुख्यमंत्र्यांना सुध्दा आम्ही सांगत आहोत की रिंग रोड प्रकल्पाला विरोध करतोय कारण पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या अंगाने विरोध करत आहोत.

    पुणे: गावागावात रिंग रोड होणार असून हजारो शेतकरण्याची शेतजमीन या प्रकल्पात जाणार आहे. पिक बागायती जमीन रिंग रोड प्रकल्पामध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करायचे हा प्रश्न घेऊन सगळे शेतकरी आज पुणे विधान भवन हिते ठिय्या आंदोलन मांडून या प्रकल्पचा विरोध करत आहे. या आंदोलनात जेष्ठ समाज सेवक बाबा आढाव सहभागी झाले आहेत.

    महाराष्ट्रमध्ये एका थोबाडीत शब्दाबद्दल किती घाणेरड्या प्रकारचं राजकारण चालू आहे. आणि इथे शेतकऱ्याचे प्रश्न तुम्ही सोडवायचे दुर्लक्ष करता. मुख्यमंत्र्यांना सुध्दा आम्ही सांगत आहोत की रिंग रोड प्रकल्पाला विरोध करतोय कारण पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या अंगाने विरोध करत आहोत. तुम्ही पुनर्वसनाची योजना दाखवाना की तिकडे आमचं भल आहे, चांगला विकास आहे. तुम्ही सांगता पैसे घ्या आणि गप्प बसा. पैसे घेऊन काय करणार आहे. किंवा इतर प्रश्न सुध्दा आहेत. असे मत आंदोलनात जेष्ठ समाज सेवक बाबा आढाव यानी केले.