चालत्या दुचाकीवरून महिलेचे गंठन हिसकावले, फरार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर गेलेल्या महिलेचे एक लाख ८० हजार रूपयांचे गंठन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. काळेवाडीतील मनपा शाळेसमोर गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : जेवण करून शतपावली करण्यासाठी बाहेर गेलेल्या महिलेचे एक लाख ८० हजार रूपयांचे गंठन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. काळेवाडीतील मनपा शाळेसमोर गुरूवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरूवारी (दि.२४) रात्री सव्वा नऊच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर पडल्या. काळेवाडीतील मनपा शाळेसमोर समोरून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख ८० हजार रूपयांचे सोन्याचे गंठन हिसकावून नेले. वाकडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भोगम अधिक तपास करत आहेत.