..तर भविष्यात भाजप – मनसे युती होऊ शकते? ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही अशी ओळख आहे. पण आता एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत विधिमंडळात दिलेला शब्द जर ते फिरवत असतील तर मग कठीण आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे.

    पुणे : राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत.

    त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलय. ते म्हणाले, ‘भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. माझ्या आणि त्यांच्या युतीची चर्चा सुरु नाहीये. युती करायची असल्यास मला केंद्राशी बोलावं लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.’ पुण्यात कोकणातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी साहित्य पाठवणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पक्ष कार्यालयात ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
    ‘तसेच युती करण्यासाठी मला आमचे पक्ष कार्यकर्ते, सहकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करावी लागेल. सद्यस्थितीत माझे सर्वच गैरसमज दूर झाल्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांचा होकार असेल. तर भविष्यात युती होऊ शकते असेही ते म्हणाले आहेत.’

    -अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही पण….
    अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही अशी ओळख आहे. पण आता एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत विधिमंडळात दिलेला शब्द जर ते फिरवत असतील तर मग कठीण आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळ ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता ते जर आपण दिलेल्या शब्दावरून पलटी मारत असतील तर मग कठीण आहे. असे प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे. हे अत्यंत खोटारडं सरकार आहे. निवडणूक होईपर्यंत हे सर्व चालतं, पण नंतर कळतं. महाविकास आघाडी सरकारला लोक धडा शिकवतील.