Corona Virus

जेजुरीत १०० बेडचे कोविड सेंटर
जेजुरी : माझे कुटुंब माझी जबाबदारी याअंतर्गत प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली तर आपण लवकरच  करोनावर नियंत्रण मिळवू. प्रत्येकाने मास्क वापरावेत व वैयक्तिक स्वच्छता राखावी,असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जेजुरीत केले. जेजुरी येथील श्री मार्तंड देव संस्थान व प्रशासन यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या श्री मार्तंड कोविड केअर सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कडेपठार पायथ्याशी असलेल्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या शंभर बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राव यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय जगताप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,प्रांत प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, नगराध्यक्ष विणा सोनवणे ,मुख्याधिकारी पूनम शिंदे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, मार्तंड देवसंस्थांनचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप आदी उपस्थित होते.

गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी श्री मार्तंड देवस्थान तर्फे उभारण्यात आलेले १०० बेडचे चे हे सेंटर राज्यात आदर्श ठरेल असे काम याठिकाणी करून दाखवू असे मुख्य विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले .कार्यक्रमाचे नियोजन देवस्थानचे विश्वस्त राजकुमार लोढा,अड. अशोक संकपाळ,शिवराज झगडे, पंकज निकुडे,अड प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, राजेंद्र जगताप ,सतीश घाडगे यांनी केले.