पुणे महापालिकेत आतापर्यंत ३७४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

  • मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये २९८ कायमस्वरूपी आणि ७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि पालिकेत नोकरीचं आश्वासन पाळलं जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

 पुणे : पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तसेच पुणे महापालिकेत आतापर्यंत ३७४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १३ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये २९८ कायमस्वरूपी आणि ७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि पालिकेत नोकरीचं आश्वासन पाळलं जाईल, अशी माहिती महापौरांनी दिली आहे. 

कामात हलगर्जीपणा केल्यामुळे पुणे पोलीसातील ११  जणांवर पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई केली असून यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉन्स्टेबल अशा ११ जणांचा समावेश आहे. दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर आळा बसवण्यासाठी पालिकेसह स्थानिक प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे.