रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने तरुणांची केली ‘इतक्या’ लाखांची फसवणूक

रोपींनी आपसात संगनमत करून कसबे आणि इतर उमेदवारांना मिनिस्ट्री कोट्यातील रेल्वे टीसी व इतर पदासाठी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मिनिस्ट्री कोट्यातील फी म्हणून सर्वांकडून ३८ लाख ९० हजार रुपये घेतले.

    पिंपरी:  मिनिस्ट्री कोट्यातून रेल्वेत नोकरी देण्याच्या बहाण्याने ३८ लाख ९० हजार रुपये घेतले. एवढेच नाही तर खासगी क्लासमध्ये ४५ दिवसांचे ट्रेनिंग देऊन बनावट जॉइनिंग लेटर देऊन नोकरी न लावता फसवणूक केली. याप्रकरणी तेरा जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव-दाभाडे येथे घडला.
    राहुल ढोलपुरीया, मनीष ढोलपुरिया, संगीता ढोलपुरीया, (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश), ब्रम्हकुमार ढोलपुरीया, संतोषकुमार पंडित, रवी, मोहित, दीपकसिंग, रोहित गडलिंगकर, विशाल ट्रॅव्हल्सचे मालक, ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्युटचे शिक्षक, महिला आणि इतर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर दिलीप कसबे (वय ३४, रा. त्रिमूर्तीनगर, मळवली, ता. मावळ) यांनी तळेगाव – दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०१९ ते १ ऑगस्ट २०२१ या कालावधीत यशवंतनगर – तळेगाव – दाभाडे येथे घडला. आरोपींनी आपसात संगनमत करून कसबे आणि इतर उमेदवारांना मिनिस्ट्री कोट्यातील रेल्वे टीसी व इतर पदासाठी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मिनिस्ट्री कोट्यातील फी म्हणून सर्वांकडून ३८ लाख ९० हजार रुपये घेतले. त्यानंतर कसबे व इतर उमेदवारांना खासगी क्लासमध्ये ४५ दिवसांचे ट्रेनिंग दिले. त्यानंतर त्यांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन कोणतीही नोकरी न देता फसवणूक केली. तळेगाव – दाभाडे पोलिस तपास करत आहेत.