वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या ‘स्पा सेंटर’वर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; पाच महिलांची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे नाशिक फाटा रोडवर एका इमारतीमध्ये कुंल्या थाई स्पा या मसाज सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली.

पिंपरी: पिंपळे सौदागर येथील कुंल्या थाई स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या एका वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा मारला. त्यात पाच महिलांची सुटका केली असून एकाला अटक केली आहे.

विनोद विश्वनाथ घाटोळकर (वय ३४, रा. गोकुळधाम हाऊसिंग सोसायटी, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी घाटोळकर हा स्पा सेंटरचा मॅनेजर आहे. त्याच्यासह स्पा सेंटरचा चालक मालक भरत पवार (वय २७, रा. काळेवाडी) याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे नाशिक फाटा रोडवर एका इमारतीमध्ये कुंल्या थाई स्पा या मसाज सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर सोमवारी दुपारी पावणे पाच वाजता छापा टाकला. त्यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली.

आरोपी विनोद आणि भरत हे सुटका केलेल्या महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या रकमेतून आरोपी आपली उपजीविका भागवीत होते. पोलिसांनी स्पा सेंटरचा मॅनेजर विनोद याला अटक केली आहे. तर स्पा सेंटरचा मालक भरत याचा शोध पोलीस घेत आहेत. सांगवीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले तपास करीत आहेत.