agriculture labour bill not implemented state till study says ajit pawar

पुणे : शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधी नगर या झोपडपट्ट्या मेट्रोमुळे कशाप्रकारे बाधित होतील याची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचवा. शक्य झाल्यास त्यांचे जागेवरच पुनर्वसन अन्यथा शिवाजीनगर मतदारसंघातच कशाप्रकारे करता येईल यादृष्टीने चाचपणी करून पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा, असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले.

मेट्रोबाधित झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासंदर्भात पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी, आमदार सिध्दार्थ शिरोळे, नगरसेविका स्वाती लोखंडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांसह महामेट्रो, पीएमआरडीए, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. कामगार पुतळा झोपडपट्टी वासियांच्या वतीने भाऊ शिंदे, अशोक लोखंडे, अप्पा आखाडे, महेंद्र कांबळे, सविता वाघमारे यांनी तर राजीव गांधी झोपडपट्टीच्या वतीने धनंजय क्षीरसागर, अरविंद कांबळे यांनी बाजू मांडली.