…यापूर्वी आरोप केलेल्या नेत्यांच्या चौकशीचे काय झाले, ते सोमय्यानी सांगावे

भाजपातील वरीष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर बेछुट आरोप करत आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नसून यापूर्वीही त्यांनी अनेक नेत्यांवर असे आरोप केले आहेत. 2017 मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर 300 कोटींच्या मनि लॉण्ड्रिंगचा आरोप केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर पॉन्झी स्किमच्या माध्यमातून 10 लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला.

  पिंपरी – राज्याच्या सत्तेपासून दूर ठेवल्याची मनात सल असल्यामुळे भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी किरीट सोमय्या यांना आरोप करण्यासाठी पुढे केले आहे. सोमय्या यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर राहून नागरिकांसाठी आहोरात्र कर्तव्य पनाला लावणारे अजित पवार यांच्यावर आरोप केला आहे. सोमय्या यांनी राजकीय सुडबुध्दीने हा आरोप केला असून यापूर्वी ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले, ते नेते आज भाजपात जाऊन पवित्र झाले का?.

  या आरोपाचे पुढे काय झाले याचे सोमय्यानी स्पष्टीकरण द्यावे. उगाच अजितदादांवर बेछुट आरोप करून आपली हुशारी चालवू नये. सोमय्याच्या आडून सुडाचे राजकारण करणा-या भाजपा नेत्यांना राज्यातील जनता कदापी भीक घालणार नाही, अशा शब्दांत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला आहे.

  भाजपातील वरीष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर बेछुट आरोप करत आहे. या आरोपात कोणतेही तथ्य नसून यापूर्वीही त्यांनी अनेक नेत्यांवर असे आरोप केले आहेत. 2017 मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर 300 कोटींच्या मनि लॉण्ड्रिंगचा आरोप केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर पॉन्झी स्किमच्या माध्यमातून 10 लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला.

  माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर देखील घोटाळ्याचे आरोप केले. माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर देखील विविध योजनांच्या माध्यमातून 6 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला. त्यांच्याविरोधात तक्रार देखील देण्यात आली. मात्र, हे मंत्री भाजपात प्रवेश करताच त्यांच्यावरील आरोप सोमय्यानी मागे घेतले. भाजपात गेल्यानंतर हे भ्रष्ट मंत्री पवित्र झाले का ? यांच्यावरील आरोपाचे काय झाले ? याचे उत्तर सोमय्यानी अधी द्यावे. त्यांचे आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशातला प्रकार असून राज्याची जनता याला कदापी भीक घेणार नाही. आरोप केल्यानंतर मॅनेज होणा-या सोमय्यानी अजितदादांबद्दल बोलाताना दहावेळा विचार करावा, असा इशारा माजी आमदार लांडे यांनी दिला आहे.

  कालच एका कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले भाजपमध्ये गेल्यामुळे निवांत झोप लागते. चौकशीची काळजी वाटत नाही. म्हणजे सोमय्यासारखी मंडळी वेगवेगळ्या पक्षातील नेतेमंडळींना भीती घालून भाजपमध्ये सामील करण्यासाठी दलाली करीत आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजंठानगर परिसरातील स्वस्त धान्य दुकानात येऊन निकृष्ट अन्नधान्याबाबत आवाज उठवणाऱ्या सोमय्यानी तो प्रश्न तडीस लावला काय? त्या प्रश्नाचे पुढे काय झाले? किती लोकांवर कारवाई झाली? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

  केवळ सत्तेच्या बाहेर राहिलेले असंतुष्ट सोमय्या भाजपातील वरीष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी पक्षाची चापलुसी करत आहेत. अजित दादांसारख्या कर्तव्यनिष्ठ उत्कृष्ट प्रशासन सांभाळणाऱ्या नेत्यावर व त्यांच्या नातेवाईकांवर चिखलफेक करणे सोमय्याना शोभत नाही, असे माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.

  भ्रष्टाचार करणा-या सत्ताधा-यांना जनता सोडणार नाही – लांडे

  सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्ट पदाधिका-यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला नरक बनविले आहे. लोकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या हात मारणा-या सत्ताधा-यांना शहरातील जनता येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सोडणार नाही. त्यावेळी खरे भ्रष्टाचारी कोण हे समोर येईल. भ्रामक आणि खोट्या गोष्टी सांगून सत्ताधा-यांनी जनतेची दिशाभूल केली. “खोटं बोल पण रेटून बोल” ही पद्धत आता चालणार नाही. येणा-या निवडणुकीत जनताच सत्ताधा-यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केला आहे.