कामावरून काढून टाकल्याने चालकाने केले असे काही की….

आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेच्या मोटारीवर चालक म्हणून कामाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी यांनी कामावरून काढून टाकले.

    पिंपरी: कामावरून काढल्याच्या रागातून मोटार चालकाने भावासोबत मालकाची मोटारकार जाळल्याची धक्कादायक घटना इंद्रायणीनगर – भोसरी येथे घडली आहे. विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मोटार मालकाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेच्या मोटारीवर चालक म्हणून कामाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी यांनी कामावरून काढून टाकले. या कारणामुळे संतापलेल्या आरोपी विनोदने आपल्या भावासोबत इंद्रायणीनगर – भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे येऊन मोटारीवर स्फोटक द्रव्य टाकून २२ लाख रुपयांची मोटारकार जाळून टाकली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.