ड्युटीवर उपस्थित वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने केले असे काही की …..

पोलीस कर्मचारी निखिल नागवडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते वाहतूक विभाग कोंढवा येथे नेमणुकीस आहेत. दरम्यान काल लुल्लानगर चौकात मुसळधार पाऊस झाल्याने पाणी साचले होते.

    पुणे: खाकी वर्दी म्हणताच अनेकदा डोळ्यासमोर  दंडुकेधारी, कायदा बडगा दाखवणारे पोलीस आठवतात.परंतु पोलिसांमधील माणुसकीचे दर्शनही अनेकदा पाहायला मिळते. असा काहीसा प्रसंग पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. पुण्यात सातत्त्याने कोसळत असल्याने अनेक भागात पाणी साठले, पावसामुळे काल लुल्लानगर चौकात मुसळधार पाऊस झाल्याने पाणी साचले होते तुंबलेल्या पाण्याचा वाहनचालकांना वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होत होता. ही बाब तिथे ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीस निखिल नागवडे यांच्या लक्षात आहे.
    प्रसंगावधान राखत त्यांनी हातात लोखंडी बार घेऊन तुंबलेले ड्रेनेज काढले आणि पाण्याला वाट मोकळी करुन दिली आहे. हे पाणी काढता असतानाच त्यांचा
    व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी केलेल्या या कामाचे सोशल मीडियावर कौतुक केलेल्या कृतीचे नेटकऱ्यांनीही कौतुक केले आहे. नेजचे मोकळेकरुन पाण्याला वाटकरून दिली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्या पोलिसाचे पुणेकर कौतुक करत आहेत.

    पोलीस कर्मचारी निखिल नागवडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते वाहतूक विभाग कोंढवा येथे नेमणुकीस आहेत. दरम्यान काल लुल्लानगर चौकात मुसळधार पाऊस झाल्याने पाणी साचले होते. वाहन चालकांना त्याचा त्रास होत होता. गुगघ्याखाली लागेल इतके पाणी साचले होते. यावेळी कर्तव्य बजावणाऱ्या निखिल यांनी स्वतः हातात लोखंडी बार घेऊन तुंबलेले ड्रेनेज काढले आणि पाण्याला वाट मोकळी करुन दिली आहे. या कर्मचाऱ्याचे नागरिक कौतुक करत आहेत.