स्वयंशिस्तीमुळे सोरतापवाडी गाव ”कोरोना फ्री”

लोणी काळभोर : ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्र येऊन घेतलेल्या योग्य खबरदारीमुळे, स्वयंशिस्तीमळे सोरतापवाडी गाव बिनधास्त ''कोरोना फ्री'' आयुष्य जगत आहे. मागील अडीच महिन्यांपासून कोरोना व्हायरस

लोणी काळभोर : ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्र येऊन घेतलेल्या योग्य खबरदारीमुळे, स्वयंशिस्तीमुळे सोरतापवाडी गाव बिनधास्त ‘कोरोना फ्री’ आयुष्य जगत आहे. मागील अडीच महिन्यांपासून कोरोना व्हायरस थैमान घालत असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी सारखे दहा हजार लोकसंख्येचे मोठे गाव मात्र कोरोनापासून अद्याप तरी कोसो दूर आहे.

पूर्व हवेलीमधील उरुळी कांचन, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कोरेगाव मूळ, कदमवाकवस्ती सारख्या गावात मागील साठ दिवसांच्या कालावधीत वीसहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोनाग्रस्त रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, सोरतापवाडी व परिसरात अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही हे विशेष आहे. सोरतापवाडी ग्रामस्थांनी आपल्या चौकस व स्वयंशिस्त व शासनाने घालुन दिलेल्या नियमांच्या पालणामुळे कोरोनाला आपल्या गावात प्रवेश करु दिला नाही. हे गाव अगदी निर्धास्त आहे.

पुणे-सोलापुर महामार्गावर फुलांचे गाव म्हणुन ओळख असलेल्या सोरतापवाडी गावची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. येथील बहुसंख्य गावकऱ्यांचे उरुळी कांचनसह पुणे शहरात कामानिमित्त ये जा असली तरी, स्वयंशिस्त व शासनाने घालुन दिलेल्या नियमांच्या पालणामुळे कोरोनाला गावात येऊ दिलेला नाही. गावकरी सोशन डिस्टसिंगचे नियम पाळण करत असताना दिसुन येत आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना सरपंच सुदर्शन चौधरी म्हणाले, पुर्व हवेलीत कोरोनाचा पहिला रुग्न आढळुन येताच, ग्रामस्थांची बैठक बोलावून कोरोनाला दुर ठेवण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली होती. ग्रामस्थांनी स्वयंमस्फुर्तीने योग्य ती खबरदारी घेत आजपर्यंत तरी कोरोनाला दूर ठेवले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव समजावा यासाठी केंद्र शासनाने तयार केलेले ‘आरोग्यसेतू ॲप’ सोरतापवाडी परीसरातील अडीच हजाराहुन अधिक नागरिकांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केले आहे. वरील ऍप डाऊनलोड करण्याबाबत सोरतापवाडी गाव जिल्हातच नव्हे तर संपुर्ण राज्यात अग्रेसर आहे.