संगमनेरच्या यशोधन कार्यालयात कोविड- १९ करिता विशेष हेल्पलाईन सुरू

थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली माहिती
अहमदनगर :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य,जिल्हा व तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी सातत्याने काम केले जात असून अतिगंभीर रुग्ण व इतर तात डीच्या मदतीसाठी यशोधन कार्यालयाच्यावतीने हेल्प लाईन सुरु करण्यात आली असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.

कोविड १९ हेल्पलाईन व इतर उपाययोजनांबाबद माहिती देतांना ते म्हणाले कि,  संगमनेरमधील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन व सहकारातील संस्थांच्या पुढाकारातून मोठे प्रयत्न केले जात आहे .नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात रॅपीट टेस्ट सुरु असून घुलेवाडी रुग्णालयात कोविड तपासणी सुविधा केली आहे. तसेच नगरपालिकेच्या वतीने कॉटेज हॉस्पीटल, मौलाना आझाद मंगल कार्यालय तर अमृत उद्योग समूहाच्या पुढा कारातून होस्टेलमध्ये व मालपाणी समूहाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करुन हा कोरोना आपल्याला संपुष्ठात आणायाचा आहे.तालुक्या तील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.कोविड १९ रुग्णांची तातडीने तपासणी व उपाययोजना सुरु केल्या आहे. एसएमबीटी हॉस्पीटल धामणगांव येथे अतिदक्षता कोविड सेंटर ही सुरु करण्यात आले आहे. याच बरोबर कोरोना रुग्णाच्या उपचारा संदर्भाने मदत, कोरोना रुग्णाला ऍम्बुलन्स, कोरोना रुग्णाला बेड मिळण्यात अडचण,कोरोना रुग्णाला अती तातडीच्या उपचाराची गरज हवी आहे का ? यासाठी यशोधन कार्यालयाच्या वतीने ९०७५०३७०३७ महेश वाव्हळ या नंबर वर हेल्पलाईन सुध्दा सुरु करण्यात आली आहे.अशी माहिती त्यांनी दिली आहे.