वाघोलीत विशेष पोलीस अधिकारी संकल्पना कार्यान्वित

वाघोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या लोणीकंद पोलिसांनी आता कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे

 पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी राबवली संकल्पना

वाघोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या महिनाभरापासून अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या लोणीकंद पोलिसांनी आता कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार वाघोलीतील सहा वॉर्ड मधील काही नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. पोलिस-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून नियुक्त केलेले विशेष पोलीस अधिकारी काम करणार आहेत.

वाघोली परिसरामध्ये कोरोनाचा होत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोणीकंद पोलिसांच्या वतीने वाघोलीमध्ये विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या वाघोलीतील किराणा, भाजीपाला व इतर काही जीवनावश्यक व अत्यावश्यक दुकाने बंद आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासंदर्भात व पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी अडचणी येत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी विशेष पोलीस अधिकारी संकल्पना राबवून कोरोना विरुद्धचा लढा नागरिकांना सोबत घेऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे.

– नागरिकांना सोबत घेऊन कोरोना विरुद्ध लढा

यामध्ये वाघोलीतील सहा वॉर्ड मधील जवळपास ७० ते ८० विविध सोसायट्यांचे मेंबर व काही नागरिकांची तात्पुरत्या स्वरूपात विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे आयकार्ड देखील संबंधितांना दिले आहेत. पोलिस-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून नियुक्त केलेले विशेष पोलीस अधिकारी काम करणार आहेत. नागरिकांना काही अडचणी असल्यास विशेष पोलीस अधिकाऱ्यांना कळवतील. त्यानुसार सदरचे अधिकारी संबंधित दुकानदार, नागरिक किंवा पोलिसांशी संपर्क साधून मदत करतील. विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना पोलिसांच्या बरोबरीने देखील काम करण्याची संधी यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.