वडगावमध्ये ‘ई-पीक पाहणी’ जनजागृती अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील वडगाव मावळ तहसील कार्यालय महसूल भवनात ‘ई- पीक पाहणी’ जनजागृती अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये तहसीलदार मधुसूदन बर्गे तसेच नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

  यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे नायब, तहसीलदार रावसाहेब साठे, प्रसन्न केदारी, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, मंडलाधिकारी बजरंग मेकाले, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, शिवणे मंडलाधिकारी संगीता शेरकर, तलाठी निंबोळकर, माणिक साबळे, सुरेश जगताप, अजय सोनवणे, मुकुंद खोमणे, दामोदर राठोड, प्रकाश बलकवडे, उत्तम लोंढे, नाना लगड, कृषी सहाय्यक, प्रवेशक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल, महसूल प्रशासनाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

  मावळ तालुक्यातील सजामधील महसूली गावांमध्ये ई पीक अभियान राबविण्यात आले. विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी नियोजनासाठी ई-पीक पाहणी उपयुक्त ठरणार असून, ही प्रक्रिया गतीने राबवावी व शेतकरी बांधवांचा सहभाग मिळवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले होते. याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात ई-पिक पाहणी ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

  या शिबिरात गाव पातळीवर ऑनलाईन ई-पीक पाहणी सातबारा भरण्याबाबत तसेच गाव स्तरावर आढावा जनजागृती केली. शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून आपल्या शेतातील सद्यस्थिती असलेली पिके तसेच फळझाडे सातबारा नोंदवावी, असे आव्हान तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

  शेतकऱ्यांसाठी ठरणार उपयुक्त

  त्यामध्ये ध्वनिक्षेपक यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बोलीभाषेतील संवाद प्रणालीने उपयुक्त माहिती देण्यात आली. पीक पाहणी ऍप हे पीक पेरणी अहवालाचा ‘रियल टाइम क्रॉप डेटा’ संकलित होण्याच्या दृष्टीने या प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग मिळवणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई देणे यासाठी पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

  ई-पाहणीमुळे राज्यातील पिकांचे क्षेत्र अचूक कळल्याने आर्थिक पाहणी व कृषी नियोजनासाठी मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत सहभाग वाढवावा, असे आवाहन तहसीलदार मंडळ अधिकारी, तलाठी यांनी यावेळी केले. या अभियानामुळे प्रथमच महसुली कर्मचाऱ्यांनी शेतकरी वर्गाशी प्रत्येक संवाद साधल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.