पुणे: दरवर्षी १५ जूनला शाळेची घंटा वाजते. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि प्रार्थनेने शाळेची सुरुवात होते.नवीन गणवेश,नवी पुस्तके, नवे मित्र मैत्रिणी, अशा आनंदमयी वातावरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष

पुणे: दरवर्षी १५ जूनला शाळेची घंटा वाजते. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा आणि प्रार्थनेने शाळेची सुरुवात होते.नवीन गणवेश,नवी पुस्तके, नवे मित्र मैत्रिणी, अशा आनंदमयी वातावरणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होते.परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शाळांचे वर्ग सुरू होण्यास काही कालावधी जाणार आहे. विद्यार्थ्यांविना शाळा या सुन्यासुन्या वाटतात. शिक्षकांना देखील अनेक महिन्यांपासून मुलांपासून दूर राहील्याची खंत मनाला वाटत आहे. निष्पाप, निरागस चेहरे समोर असताना शिक्षक स्वतःचे वय, देहभान विसरून बालकांमध्ये रमून जातात. आपल्यासमोर प्रत्यक्ष विद्यार्थी वर्गात नाहीत ही रुकरुक मनाला बेचैन करते. सोमवार (दि.१५) जून रोजी  महाराष्ट्र हौऊसिंग बोर्ड येरवडा, येथील गेनबा सोपानराव मोझे प्रशालेचे इयत्ता १० वी चे विद्यार्थी शालेय गणवेशात ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या शालेय आठवणीं जागृत केल्या. सोमवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना ॲपवर शाळेचे राष्ट्रगीत व प्रार्थना ऐकविण्यात आली आणि त्यानंतर ऑनलाइन अध्यापन वर्गांना शिकविण्यास सुरुवात झाली. ऑनलाइन अभ्यासक्रमाना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे व शालेय समिती अध्यक्ष प्रा.अलका पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत प्रतिज्ञा प्रार्थना ऑनलाइन ऐकविण्यात आली.