जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव दाभाडे : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे परिसरात तीन दिवसाच्या जनता कर्फूच्या काळात एका चित्रकाराने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी रस्त्यावर जागोजागी काढण्यात आलेल्या अनेक चित्रांनी नागरिकांचे लक्ष वेधले असून तीन दिवसाच्या जनता कर्फूच्या तिसऱ्या दिवशी तळेगाव शहरात कडकडीत बंद ठेण्यात आला होता.

 सलग तीन दिवस शहरात कडकडीत बंद

-शासनाने दिलेल्या सुचानाचे पालन व्हावे

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी यांच्या सहमतीने जनता कर्फूच्या कालावधी दि. १६, १७ व १८ एप्रिल रोजी (गुरुवार ते शनिवार) असा आहे. या तिसऱ्या  दिवसाच्या काळात सकाळी दुग्ध व्यावसयिक तसेच काही दवाखाने व सर्व मेडिकलची दुकाने चालू ठेवण्यात आली होती. या जनता कर्फूच्या काळात चित्रकार राजेश घोडेकर यांनी स्वखर्चांनी तळेगावातील अनेक महत्वाच्या रस्त्यावर नागरिकांना कोरोना बाबतची माहिती व्हावी. तसेच शासनाने दिलेल्या सुचानाचे पालन व्हावे म्हणून मोठी चित्रे रेखाटली आहेत. त्याच्या या कृतीचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी कौतुक केले.