मंचर एसटी बसस्थानकातुन एसटी मंचर-घोडेगांव मार्गे धावली

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील आकृती फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसाय करणारे प्रवीण घुले यांना भांडणाचे कोणतेही कारण नसताना पाच जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात

मंचर :आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी बसस्थानकातुन पहिली एसटीगाडी तीन महिन्यांनंतर मंचर-कळंब-चास-घोडेगांव या मार्गाने सोमवारी (दि.१५) रोजी सुरु झाली. यावेळी एसटी गाडीला पुष्पहार घालुन उपस्थितांनी स्वागत केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गेले तीन महिने सार्वजनिक वाहतुक बंद होती.त्यामुळे मंचर बस स्थानकामध्ये शुकशुकाट होता. कोरोना प्रादुर्भावामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना रोग प्रतीकारक क्षमतेच्या कारणाने तुर्त प्रवासास परवानगी नाही. चालक वाहक यांना रोटरी क्लब मंचरच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले, अशी माहिती राजगुरुनगर एसटी आगारप्रमुख रमेश हांडे,वाहतुक निरिक्षक तुकाराम पवळे यांनी दिली.

मंचर बसस्थानकात चालक, वाहक,नियंत्रक,अधिकारी व प्रवाशांचे अभिनंदन करुन उद्योजक अजय  घुले, अ‍ॅड. बाळासाहेब पोखरकर ,भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे,अमोल शिंदे,धर्मवीर पतसंस्थेचे संचालक पप्पूशेठ थोरात, उद्योजक दिपक चवरे,तुषार कराळे आदी शुभेच्छा दिल्या. यावेळी एसटीचे कर्मचारी,अधिकारी,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक गौरव काळे, सहाय्यक वाहतुक निरिक्षक महेश विटे,वाहतुक नियंत्रक मोहमद सय्यद आदी उपस्थित होते.