शिरूर तालुक्यात सुरू होणार तालुकांतर्गत एस टी सेवा सुरू

शिरूर : कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये लालपरिही लाॅकडाऊन झाली होती परंतु आता लाॅकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्याने सोमवार दि.१५ रोजी पासुन शिरूर बस स्थानकामधुन तालुका अंतर्गत एस टीची सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यांनी दिली.

       तालुकाअंतर्गत प्रवासी वाहतूक करताना २२ पेक्षा जास्त प्रवासी एसटी बसमध्ये घेतले जाणार नाहीत.शारीरिक अंतर राखण्याची तसेच प्रवाशांनी मास्क लावणे,सॅनिटाझरचा वापर करणे यांसह शासनाच्या सुचनांचे व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून शिरूर बस स्थानकातुन शिरुर तालुका अंतर्गत एसटी सेवा सोमवार १५ जून पासून सुरू करण्यात येणार असुन त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे.
*शिरूर – चाैफुला*- सकाळी साडे सहा वाजता,दहा वाजता,दुपारी दिड वाजता व संध्याकाळी पाच वाजता, 
*शिरूर – नारायणगाव*- सकाळी सव्वा आठ वाजता. 
*शिरुर – शिदोडी* – दुपारी सव्वा तीन वाजता. 
*शिरुर – वाघोली* – सकाळी आठ वाजता,दुपारी बारा वाजता,दिड वाजता व संध्याकाळी पाच वाजता. 
*शिरूर – शिक्रापूर* – सकाळी सात वाजता. 
*शिक्रापुर – पाबळ* – सकाळी आठ वाजता,दहा वाजता व दुपारी बारा वाजता. 
*शिक्रापुर – शिरूर* – दुपारी दोन वाजता.
 
या वेळापत्रकाप्रमाणे शिरूर बस स्थानकातुन एस टी ची सेवा सुरू करण्यात येणार असुन प्रवाशांच्या सेवेत रूजु झालेल्या एस टीचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यांनी केले आहे.