यमुनानगरला कोरोना लसीकरण केंद्र सुरु करा नगरसेवक उत्तम केंदळे यांची मागणी

कोरोना पुन्हा वेगाने परतला आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण होणे गरजेचे असल्याने यमुनानगर येथील ठाकरे मैदानातील स्केटिंग रिंग या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र तातडीने सुरु करण्याची मागणी केंदळे यांनी आयुक्तांकडे काल केली.

    पिंपरी: यमुनानगर येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक (प्रभाग क्र.१३)आणि क्रीडा सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले. प्रभाग १३ मध्ये सेक्टर २२ मधील यमुनानगर दवाखान्यात लसीकरण सुरु आहे. मात्र,मोठी लोकसंख्या असलेल्या या प्रभागामुळे त्या केंद्रावर मोठा ताण येत आहे. परिणामी ज्येष्ठ आणि गंभीर आजार असलेले ४५ वर्षावरील नागरिकांना रांगेत अधिक वेळ उभे राहावे लागत आहे. दुसरीकडे कोरोना पुन्हा वेगाने परतला आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण होणे गरजेचे असल्याने यमुनानगर येथील ठाकरे मैदानातील स्केटिंग रिंग या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र तातडीने सुरु करण्याची मागणी केंदळे यांनी आयुक्तांकडे काल केली. यामुळे यमुनानगर दवाखान्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन ज्येष्ठ व गंभीर आजार असलेल्यांना तातडीने लसही मिळेल,असे ते म्हणाले.