मलठणला कोविड सेंटर सुरु करा  – दिलीप वळसे पाटील यांची सूचना

कवठे येमाई : शिरूर तालुक्यात कोरोना विषाणूचा होत असलेला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शिरूर तालुक्यातील मलठण येथील रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्याची सूचना राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

त्याच अनुषंगाने आज मलठण येथील रूग्णालयास मानसिंग पाचूंदकर पाटील, राजेंद्र गावडे शिरूर उपविभागीय अधिकारी देशमुख, तहसीलदार लैला शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता घावटे मॅडम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, गटविकास अधिकारी अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, औंध रुग्णालयाचे सिविल सर्जन डॉक्टर नंदापुरकर यांनी भेट देऊन कोविड सेंटर सुरू करण्याबाबतची पाहणी केली. मलठण येथे कोविड सेंटर सुरु करण्याबाबत योग्य त्या सूचना देत पुढील कार्यवाही तात्काळ करण्यासाठी अहवाल तयार करून जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सादर करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती राजेंद्र गावडे यांनी बोलताना दिली.