mp sambhaji raje at raigad

पुणे : राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत द्यावी असेही त्यांनी नमूद केले.

पुणे : राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत द्यावी असेही त्यांनी नमूद केले.पुण्यात झालेल्या पत्रकार परीषदेत संभाजीराजे यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टीिवषयी चिंता व्यक्त करताना, वरील मागणी केली. ते म्हणाले, ‘‘ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नद्यांचे पात्र बदलले आहे, शेतातील उभी पिके आणि माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी राज्याने केंद्राकडे आणि केंद्राने राज्याकडे बोट न दाखवता सामूहिक जबाबदारी घेऊन शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत जाहीर करावी आणि तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरित द्यावी’’.
संभाजीराजे म्हणाले, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्राकडे प्रस्ताव तयार करून पाठवावा. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथक (एनडीआरएफ) अतिवृष्टी भागाचा दौरा करण्यासाठी येईल आणि शेतकऱ्यांना त्यामाध्यमातून मदत मिळेल. कोरोनाच्या संकटामुळे राज्याची तिजोरो रिकामी झाली आहे. हे खरे असले तरी शेतकरी जगला पाहिजे म्हणून कर्ज घ्यायला हरकत नाही असे सांगून केंद्राकडून मदत मिळण्यासाठी आधी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करायला पाहिजे असे सांगितले. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय एनडीआरएफचे पथक पाहणी दौऱ्यावर येऊ शकत नाही त्यामुळे राज्य सरकारने याबाबत राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली