uday samant

संपकाळातील पूर्ण वेतन प्राध्यापकांना मिळेल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटवरवरून केलीय. त्यामुळे तब्बल सात महिन्यांपासून रखडलेली वेतनाची रक्कम प्राध्यापकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील प्राध्यापकांना संपकाळातील वेतन मिळणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. एकूण १२ हजार ५१५ प्राध्यापकांना संपकाळातील पूर्ण वेतन मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

संपकाळातील पूर्ण वेतन प्राध्यापकांना मिळेल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटवरवरून केलीय. त्यामुळे तब्बल सात महिन्यांपासून रखडलेली वेतनाची रक्कम प्राध्यापकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र प्राध्यापकांना संपकाळातील वेतन देण्यात येऊ नये, अशी भूमिका विद्यार्थी संघटनांनी घेतलीय. नियमित प्राध्यापकांप्रमाणे तासिक तत्त्वावरील प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती वेळेत देण्यात यावी, अशी मागणीदेखील केलीय.

राज्यातील प्राध्यापकांनी २०१३ साली ४ फेब्रुवारी ते १० मे असा सलग ७१ दिवस संप केला होता. या संपकाळातील प्राध्यापकांचे वेतन रोखून धरण्यात आले होते. त्यावर प्राध्यापकांच्या संघटनेनं न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेदेखील प्राध्यापकांच्या बाजूनेच निर्णय लागला. त्यामुळे प्राध्यापकांना त्यांचे थकित वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

या थकीत वेतनापोटी राज्य शासनावर ९१९ कोटी ८१ लाख रुपयांचा भार पडणार आहे. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भातही येत्या चार दिवसांत निर्णय होणार असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन देण्यासंदर्भात शासन निर्णय येत्या चार दिवसात काढण्यात येईल.