शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याबाबत शिरूर तहसिलदारांना  निवेदन

शिरूर : शेतकऱ्यांसाठी पीककर्ज उपलब्ध करावे व शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करावी या मागणीचे निवेदन शिरूर तालुका भाजपच्यावतीने माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तहसिलदार यांना देण्यात आले.

 शिरूर :  शेतकऱ्यांसाठी पीककर्ज उपलब्ध करावे व शासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकरी कर्जमाफी करावी या मागणीचे निवेदन शिरूर तालुका भाजपच्यावतीने माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तहसिलदार यांना देण्यात आले.

             यावेळी शिरुर-हवेलीचे माजा आमदार बाबुराव पाचर्णे,तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे,जिल्हा भाजपा सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे,शिरुर शहराध्यक्ष व नगरसेवक नितीन पाचर्णे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल गवारे,खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे,प्रविण रंणदिवे,राजु शेख,विजय नर्के,रेश्मा शेख,रश्मी क्षिरसागर यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
          शिरूर तालुका भाजपच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी अडचणीत असून राज्यात अनेक शेतकऱ्यांचा कापुस घरातच पडुन आहे.मजबुरीने तो कमी भावात विकावा लागत आहे.चणा खराब होण्याची वेळ आली असुन शासनाकडुन खरेदी होत नाही खरीप पीककर्ज नाही.कापसाचे,तुरीचे,चण्याचे पैसे आलेले नाही.बियाणे,खते व मजुरी भागवायची कशी हा मोठा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे.
          कर्ज मिळाल्याशिवाय शेतकरी पेरणी करु शकत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन पिक कर्जाचे वाटप सुरु करण्याची आवश्यकता आहे.तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी तातडीने पुर्ण करावी आवश्यकता आहे.
          दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ओटीएस व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याचे शासनाने जाहिर केल्याप्रमाणे त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.अवकाळी पावसामुळे तसेच  चक्रीवादळामुळे शिरूर तालुक्यातील नुकसान झालेल्या सर्वसामान्य व शेतक-यांना तातडीने मदत करण्याची मागणी गुरूवार दि.२५ रोजी दिलेल्या या निवेदनात करण्यात आली आहे.