प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या विविध मागण्यांसाठी सभापतींना निवेदन

दौंड : दौंड पंचायत समिती येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिव्यागांना दिव्यांगाना रोजगार उपलब्ध करण्याबाबत शनिवार (ता.२०) रोजी सभापती आशा शितोळे यांना लेखी निवेदन देण्यात आले.

    महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक जि.प.उ. २०१८/प्र.क्र. ५४/वित्त -३ दि. २५ जून २०१८ नुसार दिव्यांगा करिता त्यांना झेपेल ते काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत देण्यात यावे व रोजगार उपलब्ध करून घ्यावा व त्यांचे जॉब कार्ड बनविण्यात यावे तसेच शासकीय धोरणानुसार रॅम्प लावण्यात यावा. त्याचप्रमाणे  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ६०% ते १००% दिव्यांग असणाऱ्या जिल्हा परिषदेमार्फत निर्वाह निधी मिळत असल्याकारणाने ४०% ते ५९% असणारे दिव्यांग वंचित असल्यामुळे ग्रामपंचायत राखीव ५ % निधी तात्काळ वाटप करण्यात यावा अश्या अनेक मागण्याचे निवेदन पंचायत समिती सभापती आशाताई शितोळे यांना देण्यात आले.
    यावेळी उपसभापती नितीन भाऊ दोरगे, पंचायत समिती सदस्या हेमलताताई फडके, प्रकाश बापू नवले, विकास कदम तसेच गट विकास अधिकारी गणेश मोरे, दौड तालुका प्रहार यांना संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष बाळासाहेब नानवर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप, मिलिंद साळवे, सलिमा पठाण, नानासाहेब सांगळे, लिंगाळी गाव अध्यक्ष, कलपनूर मारलींग तसेच दिनेश आटोळे उपस्थित होते.