… नाहीतर आठ दिवस कोकणात राहून आपल्या स्टाईलने पंचनामे करावे, चंद्रकांत पाटलांची सूचना

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आता महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सो चुहे खाकर बिल्ली चली हज को. आपल्या पायाशी काय जळतय ते पाहा, अशा शब्दात पाटील यांनी अजित पवारांना सल्ला दिला आहे.

  पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौ-यावरून टिका केली आहे. ३ तासात पाहणी होत नाही. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. पण त्यांनी ८ दिवस तिथे जाऊन राहावे. तिकडे वातावरणही चांगले आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही, असे पाटील म्हणाले. चक्रीवादळाच्या तडाख्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दौरा करुन नुकसानाचा आढावा घेतला. त्यावर भाजपच्या नेत्यांनी चहूबाजुने टिका सुरू केली आहे.

  पायाशी काय जळतय ते पाहा

  यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आता महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सो चुहे खाकर बिल्ली चली हज को. आपल्या पायाशी काय जळतय ते पाहा, अशा शब्दात पाटील यांनी अजित पवारांना सल्ला दिला आहे.

  ते म्हणाले की, अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. ३ तासात पाहणी होत नाही. अजित दादांनीही ८ दिवस कोकणात जावे आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, असेही पाटील यांनी म्हटले आहे

  भावनांची चेष्टा योग्य नाही

  दुसरीकडे पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुरु आहे. काल डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी भावूक झाल्यानंतर त्यावरुनही विरोधक मोदींवर टीका करत आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, राजकारणाची पातळी खालावली आहे. या देशात काही परंपरा आहेत.

  एखाद्या माणसाच्या भावनांची चेष्टा करायची योग्य नाही. पण मोदींना त्याने काही फरक पडत नाही, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासोबत कोणताही दुजाभाव करत नाहीत. त्यांनी गुजरातसाठी कोणतेही वेगळे पॅकेज जाहीर केले नाही, देशभरात चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांमधील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये घोषित केले आहेत.