दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपदी  कुसुम कदम

पारगाव: जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र भर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. पुणे(पूर्व) जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ यांच्यावतीने कुसुम कदम यांना दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षपद (दि.२२) रोजी प्रदान करण्यात आले.संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर संघटनेच्या वतिने पीडित अन्यायग्रस्त महिला भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असते. शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांअंतर्गत विधायक कार्य करण्यासाठी नव्या युवा पिढीला प्रोत्साहन-प्रेरणा देण्यासाठी प्रगल्भ-प्रभावी वक्तृत्व,हिम्मतवान, कणखर,लढवय्या,निर्भीड,अभ्यासू,कर्तृत्ववान अशा महिलांना या संघटनेमध्ये समावेश करून महिलांच्या सबलीकरनावर भर दिला जात असून महिलांचा सन्मान वाढवला जात आहे.