रस्त्यावर  कच-याचे ढिगारे  साचलेले ; परिसरात दुर्गंधी

हडपसर  : महंमदवाडी-कौसरबाग प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाडकर मळा चौक रस्त्यावर  ,महंमदवाडी, कृष्णानगर येथील स्मशानभूमी रस्त्यावर   मोठ्या  प्रमाणावर  कचरा  ढिगारे साचलेले  असून गेले दोनतीन दिवसांपासून  रस्त्यावर  कचरा साचून राहिल्याने  परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.

कचरा दुर्गंधीने नागरीक त्रस्त,नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
हडपसर  : महंमदवाडी-कौसरबाग प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाडकर मळा चौक रस्त्यावर  ,महंमदवाडी, कृष्णानगर येथील स्मशानभूमी रस्त्यावर   मोठ्या  प्रमाणावर  कचरा  ढिगारे साचलेले  असून गेले दोनतीन दिवसांपासून  रस्त्यावर  कचरा साचून राहिल्याने  परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.

महंमदवाडी  येथील  कृष्णानगर,स्मशानभूमीजवळ,तसेच वानवडी कडे जाणा-या चौकात कच-याचे ढिगारे साचलेले  असून कचरा दुर्गंधीने नागरीक  त्रस्त झाले  आहेत.
मनपा प्रशासनाचे, आरोग्य अधिकारी  लोकप्रतिनिधीचे याकडे  दुर्लक्ष  आहे, सतत  वरून पाऊस पडत असल्याने, माशा, डास, दुर्गंधी वाढल्याने नागरिकांच्या  आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हडपसर क्षेत्रीय  कार्यालयाच्या  अंतर्गत  असलेल्या  महंमदवाडी  प्रभागात सर्वत्र कचराच कचरा साचलेले चित्र  दिसत आहे.  अनेक दिवसांपासून  हडपसर  मधील  रस्त्यावर कचरा दिसत नव्हता आता लाॅकडाऊन काळात रस्त्यावर पुन्हा  कचरा  दिसू लिगला आहे. एकीकडे महापालिका, सरकार  कोरोनावर  लाखो रुपये  खर्च  करते.कोरोना हदपार करण्यासाठी स्वच्छता राखा असे जनजागृती  करीत  आहे मग प्रभागात ठिकठिकाणी साचलेल्या  कच-याची सफाई का केली जात  नाही  असा सवाल  नागरिक उपस्थित केला आहे. तातडीने  कचरा सफाई  करावी,ड्रेनेज,  नाले सफाई  करण्यात यावी  अशी मागणी नागरिकांनी केली आहे.