चक्क फिरते शौचालयच चोरीला !

पिंपरी : पिंपरी चिंचवड़ मध्ये चो-यांचे प्रमाण वाढले आहे. वाहन चोरी, घरफोडी, सोनसाखळी हिसकावणे यासासारख्या घटनांत वाढ झाली असताना आता चोरट्यांनी चक्क फिरते शौचालयच चोरी केल्याची आश्चर्यकारक घटना निगडीच्या चिकन चौकात घडली. ४ डिसेंबरला सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी महेश नानासाहेब आढाव (वय ४२, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी सोमवारी (दि. ७) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाकडून शहरात विविध ठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात आले आहेत. त्या पैकी निगडी येथील चिकन चौकाजवळ देखील एक फिरते शौचालय ट्रॉली (एम एच १४ / ए झेड ९८९५) ठेवण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी दुपारी सव्वातीन ते ४ डिसेंबर सकाळी सात या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 95 हजार रुपये किमतीची शौचालय ट्रॉली चोरून नेली.