खडी क्रशरमुळे मोढवे परीसरातील घरांना तडे ; धुलीकणांमुळे शेती पिकांचे नुकसान

  बारामती : बारामती तालुक्यातील मोढवे(ता.बारामती) गावाच्या परिसरामध्ये तीन खडी क्रशर मशिनमुळे या भागातील अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. तर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या खडी क्रशर मशिनवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

बारामती : बारामती तालुक्यातील मोढवे(ता.बारामती) गावाच्या परिसरामध्ये तीन खडी क्रशर मशिनमुळे या भागातील अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. तर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या खडी क्रशर मशिनवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

या भागात तीन खडी क्रशर मशिन राजरोसपणे चालू आहेत. खडी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे मोढवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे मोढवे परिसरातील ग्रामस्थांना त्याचा खूप मोठा फटका व त्रास सहन करावा लागत आहे. तेथील जमिनी खडी मशीनमध्ये होणाऱ्या धुळीमुळे नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेथील पिकांवर त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे .तेथे होणाऱ्या स्फोटांमुळे घरांना प्रचंड मोठे तडे गेले आहेत. शेता मध्ये काम करत असताना धुळीमुळे काम करणेही अवघड झाले आहे. तेथे सतत स्फोट घडवल्यामुळे त्या परिसरामध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आमच्या जमिनी खराब होते चालल्या आहेत, आम्ही कसे जगायचे, आमचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, आम्हाला या त्रासामुळे गाव सोडण्याची वेळ येऊ शकते ,अशी भीती मोढवे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. येत्या १५ दिवसात या सर्व खडी मशीन वर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांसह बारामती तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस चे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, माणिकराव काळे, तानाजी कोळेकर, सुहास टकले, दिला आहे.