काेराेना काेराेना आता बास करा; नाहीतर रस्त्यावर उतरु

वंचित बहुजन आघाडीच्या आंबेडकरांचा इशारा

पुणे : गेल्यावर्षीच्या तुलेन काेराेना कालावधीत मरण पावणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आता काेराेना काेराेना बस करा. सर्व काही सुरू करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परीषदेत दिला.

काेराेनाचे हाॅटस्पाॅट ठरलेल्या मुंबई, पुणे, अकाेले आदी ठिकाणी गेल्यावर्षी मार्च, एप्रिल आणि  मे महीन्यात मरण पावलेल्यांची संख्या आणि यावर्षी काेराेना कालावधीत या ठिकाणी  मरण पावलेल्या व्यक्तींची आकडेवारी सादर करीत  आंबेडकर यांनी िचंता व्यक्त केली. गेल्यावर्षी संबंधित ठिकाणी जास्त लाेक मरण पावले हाेते असा दावाही त्यांनी केला. काेराेनाची लागण झालेल्यांचा मृत्यूदर तीन टक्क्यापेक्षा कमी असुनही त्याचा बाऊ का केला जात अाहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

-सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अद्याप बंद

राज्य सरकार आणि  केंद्र सरकार हे एकमेकांकडे बाेट दाखविण्याचा उद्याेग करीत असल्याचा अाराेप करीत अांबेडकर म्हणाले, ‘‘ काेराेनाची स्थिती हाताळण्यासाठी अमेरीका, इंग्लड अादी देशांनी जे केले त्याची काॅपीकॅट करण्याचा प्रकार अापल्याकडे झाला अाहे. लाॅकडाऊन नंतर अनलाॅक सुरु केले असले तरी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अादेश संबंिधत िजल्हा प्रशासनाने िदले अाहे. िजल्हाधिकाऱ्यांना हे अधिकार देणे याेग्य नाही. राज्य सरकारनेच निर्णय घेतले पाहीजे. परंतु, तसे हाेताना िदसत नाही. दुकानदार, टपरी चालक, पथारी व्यावसायिक अादींची उपासमार हाेत अाहे. महापािलका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अद्याप बंद ठेवण्यात अाल्या अाहेत. एसटी सेवा सुरू केली गेली नाही. या सेवा कधी सुरू करणार हे राज्य सरकारने जाहीर करावे. कालबद्ध पद्धतीने राज्य सरकारने अनलाॅक जाहीर करायला हवा अशी अामची मागणी अाहे. जर १० अाॅगस्टपर्यंत राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर अाम्ही त्यानंतर कधीही रस्त्यावर उतरुन अांदाेलन करू’’ असा इशाराही अांबेडकर यांनी िदला.