इंदापूर शहराची वाटचाल कोरोना हाॅटस्पाॅटच्या दिशेने: हर्षवर्धन पाटील

कडक उपाययोजनां सदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा करणार इंदापूर: शहरातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. इंदापूर तालुक्यात एकुण १८ रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह सापडले आहेत. तर

कडक उपाययोजनां सदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा करणार
इंदापूर: शहरातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. इंदापूर तालुक्यात एकुण १८  रूग्ण कोरोना पाॅझीटीव्ह सापडले आहेत. तर एकट्या इंदापूर शहरात यापैकी १३ रूग्ण पाझीटीव्ह सापडले असुन  इंदापूर शहरातील ही परिस्थती अशीच चालु राहीली तर इंदापूर शहर कोरोना हाॅटस्पाॅट बणण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शहरात आणखी कडक उपाययोजना लागु करण्यासाठी इंदापूर नगरपरीषदेने जिल्हाधीकारी यांना पत्र पाठवावे, आम्हीही वरीष्ठ पातळीवर चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना संदर्भात प्रयत्न करणार, असल्याचे मत राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केले.
 
इंदापूर शहरातील कोरोना महामारीचा विळखा हळु हळु घट्ट होताना दीसुन येत असल्याने त्यावर उपाययोजना बाबत इंदापूर नगरपरीषद सभागृृृहामध्ये हर्षवर्धन पाटील यांचे नेतृृत्वाखाली सर्व नगरसेवक, अधीकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक बुधवारी सकाळी १० वाजता बोलवीली होती त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरपरीषदेचे मख्याधीकारी डाॅ. प्रदिप ठेंगल, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक भरत शहा, गटनेता कैलास कदम,नगरसेवक जगदीश मोहीते, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग शिंदे, रमेश धोत्रे, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद,जावेद शेख, गुड्डु मोमीन यांचेसह नगरपरीषद सर्व अधीकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
 
-नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई व्हावी
पाटील म्हणाले की, शासनाने लाॅकडाउनला मोकळीक दिल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढत असुन लाॅकडाउन नियम कडक करणेबाबत नगरपरीषदेने जिल्हाधीकारी यांना पत्र द्यावे, शहरात सर्वांनी वैद्यकीय अधीकार्‍यांच्या मदतीने टेस्टींगवर भर द्यावा,नगरपरीषद हद्दीतील अंगणवाडी सेवीका, आरोग्यसेवीका,नगरसेवक यांचे मदतीने दक्षता घेवुन प्रत्येकाची तपासणी करणेकामी सहकार्य करावे, शहरातील सर्वांची आॅक्सीजन लेव्हल टेस्ट घेण्यात यावी,शहर व परीसरामध्ये जनजागृती वाढवावी,व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक किरवाइ करण्याबाबतच्या सुचना दिल्या असुन नागरीकांनी स्वतची काळजी घेण्याचे आवाहन केले. मुख्याधीकारी प्रदीप ठेंगल यांनी संशयीत रूग्णांचा स्वॅब टेस्ट रिपोर्ट मीळण्यास उशीर लागत असल्याचे सांगीतले.