शिक्रापूर चाकण रस्त्यावर तीन वाहनाचा विचित्र अपघात

अपघातात बारा वर्षीय बालक मृत्युमुखी, पाच जण गंभीर शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण शिक्रापूर रस्त्यावर टेम्पो, स्कोर्पिओ आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात बारा वर्षीय मुलगा जागेवर

अपघातात बारा वर्षीय बालक मृत्युमुखी, पाच जण गंभीर

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण शिक्रापूर रस्त्यावर टेम्पो, स्कोर्पिओ आणि दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात बारा वर्षीय मुलगा जागेवर मृत्युमुखी पडला असून पाच जन गंभीर जखमी होऊन त्या पैकी दोघे जन बेशुद्ध असल्याची घटना घडली असून टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील चाकण शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीतील श्री हॉस्पिटल समोर शिक्रापूर बाजूने चाकण बाजूने चाललेल्या एम एच १४ सि पि ०६१७ या टेम्पो चालकाने समोरील वाहनास ओहरटेक करत असताना समोरून चाकण बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असलेल्या एम एच १९ बि आर ६७६२ या दुचाकीला ढोस दिली आणि त्याचवेळेस समोरून चाकण बाजूने शिक्रापूरच्या दिशेने येत असलेल्या एम एच २२ ए एम १४६६ या स्कोर्पिओ वाहनाला जोरदार धडक दिली.

यावेळी टेम्पो आणि स्कोर्पिओ या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने टेम्पो चालक आणि स्कोर्पिओ मधील दोघे गंभीर जखमी झाले तर स्कोर्पिओ मधील समाधान राजू आयनुर वय १२ वर्षे रा. रितनगाव (ता. लोहा जि. नांदेड) या बालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवरील गणेश विलास वाणी, ज्ञानेश्वर अर्जुन पवार दोघे रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरूर) जि. पुणे तसेच टेम्पो चालक प्रकाश माऊली बनकर रा. मोशी (ता. हवेली जि. पुणे) हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. स्कोर्पिओ वाहनातील दोघे बेशुद्ध असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. या सर्वांवर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत गणेश विलास वाणी रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक प्रकाश माऊली बनकर रा. मोशी (ता. हवेली) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.