तळेगाव ढमढेरेत कोरोनाप्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी

गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद, खबरदारी साठी स्वयंसेवक रस्त्यावर शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे एकाच कुटुंबातील चौघांना कोरोणाची लागण होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोना

गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद, खबरदारी साठी स्वयंसेवक रस्त्यावर

शिक्रापूर :  तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे एकाच कुटुंबातील चौघांना कोरोणाची लागण होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोना  प्रतिबंधक उपाययोजनांची  अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत असून गावामध्ये कार्यन्वित करण्यात आलेल्या साथरोग संघाच्या वतीने कडक उपाययोजना राबविण्यात येत आहे.

तळेगाव ढमढेरे ता.शिरुर येथे सुरवातीपासूनच कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परंतु दि. ८ मे रोजी तळेगाव ढमढेरे येथील एका ६० वर्षीय महिला कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू झाला असताना सदर महिलेच्या कुटुंबातील तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.  त्यांनतर ग्रामपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस ठाण्याच्या वतीने कोरोना प्रतिबंधक काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत गावात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली. त्यांनतर तळेगाव ढमढेरेचा तीन किलोमीटर परिसर पूर्णपणे सील करत गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद  करण्यात आले आहेत. नागरिकांना गावातून बाहेर जाण्यास व बाहेरून गावात येण्यास मनाई करण्यात येत आहे. तर नुकतीच गावामध्ये कोरोना साथरोग संघाची स्थापना करण्यात आली असून सदर संघामध्ये गावातील पन्नास नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत, तर या संघातील नागरिकांकडून गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच गावामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांची नोंद करण्यात येत आहे, त्यामुळे तळेगाव ढमढेरे येथील नागरिकांकडून कोरोनावर अटकाव घालण्यात आला आहे, मात्र नागरिकांना कोणतीही प्राथमिक लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर, तलाठी ज्ञानेश्वर भराटे यांसह आदी लक्ष देऊ आहे. तर यावेळी बोलताना गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तसेच वाहनचालकांची चौकशी करण्यात येत असून गावातील नागरिकांना विनाकारण बाहेर पडू दिले जात नसल्याचे पोलीस राजेंद्र मदने यांनी सांगितले.