भांडण सोडवणाऱ्यावर धारदार शस्त्राने वार; चाकण पोलीस तपास सुरु 

दिनेश सुखराम वलथरे याचे आणि त्याचा मित्र नागेश याचे भांडण सुरू होते. त्यावेळी अमरसिंग हे भांडण सोडवण्यासाठी गेले. नागेशने फळे कापण्याच्या चाकूने अमरसिंग यांच्या पोटावर वार केले. त्यानंतर नागेश घटनास्थळावरून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी: दोघांचे भांडण सुरू असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्यावर एकाने धारदार चाकूने वार केले. यात भांडण सोडवणारा व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे
    चाकण -शिक्रापूर रस्त्यावर चाकण येथे घडली. अमर उर्फ राजू राममिलन सिंग (वय ३८, रा. भुजबळ आळी, चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सद्गुरु कॉम्प्लेक्स येथे चायनीज हॉटेलच्या समोर दिनेश सुखराम वलथरे याचे आणि त्याचा मित्र नागेश याचे भांडण सुरू होते. त्यावेळी अमरसिंग हे भांडण सोडवण्यासाठी गेले. या दरम्यान नागेशने फळे कापण्याच्या चाकूने अमरसिंग यांच्या पोटावर वार केले. त्यानंतर नागेश घटनास्थळावरून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.