MPSC पूर्वपरीक्षा अचानक रद्द झाल्याने पुण्यात विद्यार्थी आक्रमक; रोहित पवार, सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांची ठरलेल्या दिवशी परीक्षा घेण्याची आग्रही मागणी

दरम्यान परीक्षार्थी आक्रमक झाल्यावर रोहित पवार, सत्यजित तांबे यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकारला १४ मार्चला परीक्षा घेण्याची आग्रही मागणी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या नेत्यांनी सरकारकडे परीक्षा वेळेवर घ्याव्यात असे सांगितले आहे.

     

    राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर एमपीएससी २०२० पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. परीक्षा कधी होणार याबाबत लवकरच तारीखा जारीह केल्या जातील असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.मात्र अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेली एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळाला आहे. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणार्‍या अनेकांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला आहे. यावेळेस भाजपचे गोपिचंद पडळकर देखील विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून चक्काजाम करताना दिसले.

    दरम्यान परीक्षार्थी आक्रमक झाल्यावर रोहित पवार, सत्यजित तांबे यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकारला १४ मार्चला परीक्षा घेण्याची आग्रही मागणी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून या नेत्यांनी सरकारकडे परीक्षा वेळेवर घ्याव्यात असे सांगितले आहे.

     

    मीडीया रिपोर्ट्सनुसार एमपीएससीने हा निर्णय घेताना पुन्हा राज्य सरकारला अंधारात ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे प्रधान सचिव याबाबत चर्चा सुरु आहे. युवा कॉंग्रेसचे सत्यजित तांबे, एनसीपी आमदार रोहित पवार, मदत व पुर्नविकास मंत्री विजय वड्डेटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहत एमपीएसीने १४ मार्चला कोरोना संकटात पुरेशी खबरदारी घेत परीक्षा घेण्याची विनंती सरकारकडे केली आहे.